कोरोना
कोरोना


आली आली ही महामारी
कोरोना तिचे नाव ।
जगणे हे झाले दुर्धरॊ
आयुष्याचा मोडे डाव ।।ध्।।
सर्दी, शिंका, खोकला
हा सुरवातीचा बनाव ।
घसा ही दुखे तीव्र
डोके ही दुखे फार ।।१।।
श्वास कोंडे घेताना
जणू जवळी आला हा काळ ।
घाबरुणी जीव वेडा
होई हृदयविकाराचा शिकार ।।२।।
हात धुवा सातत्याने
बांधा तोडांवर हा मास्क ।
दो गज की दूरी
हा सध्या तरी ऊपाय ।।३।।
सेवन करा ऊष्ण पाणी
शीतपेयावर बहिष्कार ।
घरगुती जेवण हे अम्रुत
बाह्यखाद्यपदार्थ हा जणू विकार ।।४।।
लॉकडाऊन सर्व देशभर
घरी बसूनी जणजण बेजार ।
थांबली अर्थव्यवस्थेची चाके
उद्भभवला बेकारीचा प्रकार ।।५।।
आता खर्च फक्त संचिताचा
नाही शिलकीचा व्यवहार ।
धाय मोकलोणी रडतो
हा गरीबीचा शिकार ।।६।।
थांबले दळणवळण
थांबले शिक्षण ।
आता मोबाईलवरुन
ऑनलाईन संस्कार ।।७।।
जिथे निषेध असे मोबाईलचा
तेच करती त्याचा प्रचार ।
आत्महत्या करतो आहे रे भोळा
गरिब विद्यार्थ्यांचा मायबाप ।।८।।
थांबव आता हे कोरोना संकट
कर विघ्नहर्त्या त्याचा संहार ।
निसर्ग जरी झाला सुंदर तरीही
फक्त जगा निरागस स्वच्छंद हे
शिकवून जात आहे दोनहजार वीस साल ।।९।।