कोरोना तू जा रे तुझ्या गावाला
कोरोना तू जा रे तुझ्या गावाला
कोरोना कोरोना कसला असतोस तू
सगळे घाबरतात तुला
सांग ना कसा दिसतोस तू?
आणि कुठे राहतोस तू?
चित्र तुझ पाहीलय मी,किती असतोस लहान
नाही नाक डोळे, नाहीत हात पाय,
नाहीत कान, अन् नाहीत तुला गाल,
रंग तेवढा आहे तुला लाल - लाल - लाल
कुठून आलास काय माहीत,
दिलीस सुट्टी शाळेला,
पहील्यांदा वाटली मज्जा,
पण आता करमेना रे मला
तुझ्या भितीने रे आता नाही जात खेळायला
खेळून खेळून मोबाईल गेम्स आलाय आता कंटाळा
नाही शाळा, नाहीत मित्र
ऑनलाईन क्लास आवडेना
एवढी मोठी भेटलेय सुट्टी,
पण गेलो नाही मामाच्याही गावाला,
सारखा - सारखा घालावा लागतोय मास्क
वैतागलोय रे सॅनिटायझर ला
कोरोना - कोरोना ऐक ना रे आता,
पाहुणचार तुझा परवडत नाही,
तु जा रे तुझ्या गावाला,
थाट तुझा मांडायला, येवु नको रे पुन्हा पुन्हा..
