कोरोना काळातील देवदूत
कोरोना काळातील देवदूत
आला आला कोरोना कोरोना
कोईभी उसे डरोना डरोना.....
बसूया आपण सारे घरातच
काळजी घेवू आपली आपणच....
आज शहरात संशयित सापडले
कोरोनाचे पेशंट वाढायला लागले..
जीवन क्षणभंगूर झालेय ना
आता तरी माणूसपण जपूया ना...
तहान लागली की विहीर खणणे
हा स्वभाव आहे आपला हे जाणणे...
आता तरी आपण शहाणे होवूया
कोरोनाला सारेच पळवून लावूया..
कोरोनाने शिकवले आज माणूसपण
घरातच राहून जपले कौटुंबिक क्षण...
पोलीस,डाॅक्टर सदैव दिनरात राबतात
त्यांचे कुटुंब त्यांची वाट पाहत असतात,...
अंगणवाडी सेविका,शिक्षक सारेच काम करतात
स्वतः आतल्या ते कुटुंबाची काळजी घेतात....
कित्येक जणांचे नाहक जीव गेले
डाॅ.नी प्राण वाचवण्याचे खूप प्रयत्न केले....
रोज हजारोंच्या संख्येने पेशंट येतात
त्यांना वाचवण्याचे सारे प्रयत्न डाॅ.करतात...
अरे मानवांनो स्वतःबरोबर काळजी घ्यावी इतरांची
सदैव मास्क वापरा, निगा राखा सतत हातांची...
