कोरोना-एक अदृश्य शत्रू
कोरोना-एक अदृश्य शत्रू
1 min
455
युद्ध आपले चालू आहे
एका अदृश्य शत्रूशी
लपून छपून वार करतोय
खेळतोय आपल्या प्राणाशी
माणसांचाच वापर करतोय
माणसाला संपवण्यासाठी
दहशत सर्वत्र माजवलीय
टपलाय हल्ला करण्यासाठी
जमावात वाढते शक्ती
शिकार करतो सा-यांची
जमावबंदीला साथ देऊन
जिरवू आपण कोरोनाची
शस्त्राशिवाय खेळायचे
युद्ध आता कोरोनाशी
विवेकाने वागू सारे
मुकाबला करू संकटाशी
