STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

कोरोना दिवाळी

कोरोना दिवाळी

1 min
311

💐🎊कोरोना दिवाळी🎊💐

फटाक्यांची होळी होण्यापेक्षा

गरीबांची झोळी भरन चांगलं।

आकाशी आकाश कंदील, झग झगती रोषणाई लावण्यापेक्षा 

झोपडीत अंधारात दोन पणत्यांची

 रोषणाई लावणं चांगलं।

आपल्या आपल्यात आग्रह करून खाऊ घालण्यापेक्षा।

गरीबाच्या माय लेकराला पोटभर खाऊ घालन चांगलं।

कोरोनामुळे अश्रूंचे तेल घालून पंचप्राणाच्या ज्योती लावणाऱ्या कुटुंबाला आधार देणं चांगलं।

बिनामास्कचं बाहेर हिंडण्यापेक्षा

घरातल्या जेष्ठ व्यक्तीचा विचार करून स्वतः काळजी घेणं चांगल।

हेही दिवस जातील अशी परमेश्वराला प्रार्थना करत पुढच्या वर्षीची दिवाळी चांगली आनंदात जाईल हा आशीर्वाद देवाला हात जोडून मागणं चांगलं।

सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा


Rate this content
Log in