कोरोना आणि प्रशासन
कोरोना आणि प्रशासन
आता एक निश्चय करा मनी,
नका नका जाऊ बाहेरी,
कोरोना नका आणू घरी,
आपुल्या कुंटुबाशी प्रेम धरी
मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,
असे नेते महाराष्ट्राचे,
सर्व सोयी देतील माणसा,
खूप ताण नका देऊ प्रशासना,
आता एक निश्चय करा मनी,
नका नका जाऊ बाहेरी
मुले तुमची लहान लहान,
स्वप्न त्यांचे महान महान,
आई, बहिण, पत्नी आपली,
सर्व थांबू आपण घरी,
आता एक निश्चय करा मनी,
नका नका जाऊ बाहेरी
निश्चय केला, केला पक्का,
नाही जाणार बाहेर आता,
नको पोलिसांचे फटके,
संयम ठेव मनी थोडा,
नको कोरोनाचा विळखा,
आता एक निश्चय करा मनी,
नका नका जाऊ बाहेरी
निश्चित कोरोना मरेल,
त्याचा होईल सर्वनाश,
घरी घरी बस माणसा,
साथ दे तुझी प्रशासना,
आता एक निश्चय करा मनी,
नका नका जाऊ बाहेरी
