STORYMIRROR

SHUBHAM KESARKAR

Others

3  

SHUBHAM KESARKAR

Others

कोरडे शेत !!

कोरडे शेत !!

1 min
239


दुष्काळाचा तो लोळ सारा

जमिनीवरी तो विभागला

भुकेच्या त्या पोटी पायी

शेतकरी आमचा निजला !!धृ!!


वर्षभराचे कष्ट एकट्याचे

कोणी नसे सोबतीस

करपून जाते नशीब त्यांचे

दुष्काळाचे चटके सोसत !!१!!


रोज नव्या कर्जात बुडून

सोसतो तो हजारो छळ

आत्महत्येच्या उंबरठ्यावर 

पोहचलेल्या शेतकऱ्याचे हे मन !!२!!


नापीक जिमिनिवर उगवत्या

जसे एक एक रोपट्याचे मोल

काळ्या मातीतील हे कण कण

मिळे आपणांस हे धान्य अनमोल !!३!!


किंमत आपणास ठेवायला हवी

त्यांनी केलेल्या कष्टांची

दोन मिनटं करा संवाद त्यांच्याशी

मिळेल उत्तर आपणांस त्यांच्या सुख दुःखांची !!४!!


जीव तुटतो जेव्हा आपला

बळीराजा आत्महत्या करतो

कुटुंबाचा वाली जेव्हा क्षुल्लक पैसांसाठी

एक सेकंदात आपले जीवन संपवतो! !५!!


एवढं स्वत झालय का हो जीवन

एका क्षणात संपवायला

माणुसकीचा गळा आवळून त्याजागी

धनदेशाला बसवायला !!६!!


तोच जाणतो खऱ्या कष्टच हे फळ

भाकर तुकड्याचे हे मोल

करत असलेली त्याची तडजोड

मिळावा त्या धान्यास योग्य हमीभाव

त्यासाठी झटतो तो रात्रंदिन

पाई पाई ची करतो तो परतफेड

पाई पाई ची करतो तो परतफेड !!७!!



Rate this content
Log in