कोपरखळी
कोपरखळी
1 min
118
नव्या नव्या सूनबाई
आल्या हो सासराला
पाऊल पहिले टाकले
सजणाच्या घराला
नव्याचे नऊ दिवस
काही दिवसात संपले
हे कर,ते असे कर सांगून
सासूबाईने सूनबाईंला पिडले
हो करते म्हणून सुनबाई
लागे बाई आता कामाला
शब्द कोपरखळ्या सासूबाईंच्या
सून लागली आता झेलायला
या कोपरखळीतही सूनबाईने
अती आनंद अंतरी मानला
खूश केले छान सूनबाईने
हौशी सासू अन सासर्याला
सजणाची साथही लाभली
संसार सुखी होवू लागला
संसारवेलीवर छान आता
फुले लागली फुलायला
