STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

कोपरखळी

कोपरखळी

1 min
219

आल्या होळीच्या सणाला 

सासूबाई आवर्जून

पुरणपोळीचा हट्ट

बसल्या की हो धरुन  (१)


डाळ आधी निवडून

वाटीने मोजून घ्यावी

गरम पाण्यात तेल

हळद थोडी घालावी   (२)


लक्ष सारख्या ठेवीत

हटताना की पुरण

गूळ मोजून घाल

पातळ होईल पुरण   (३)


कणीक सैल तिंबावी

भरपूर तेल घाल

कणकीत सूनबाई

थोडासाच मैदा घाल   (४)


उंडे भरले पुरणाने

गोल पातळ पोळी

कोपरखळ्यांनी सूनेला

सासूने बेजार केली   (५)


साहित्याला गुण द्या
लॉग इन