कोणीतरी कुठेतरी
कोणीतरी कुठेतरी
कोणीतरी कुठेतरी
अचानक समोर येतं
अलगद आणि सहजतेने
मनाचा ठाव घेतं ||0||
कळत नकळत हे
क्षण हळवे भेटतात
मनात मग प्रीतीच्या
ठिणग्या पेटतात
विसावा मनाला
आयुष्यभाराचा देतं
अलगद आणि सहजतेने
मनाचा ठाव घेतं ||1||
सांगून क्षण हे कोवळे
जीवनात येत नाहीत
किंमत मोजल्याशिवाय
सुख काही देत नाहीत
विरहाच्या जगीही
मन आपलं नेतं
अलगद आणि सहजतेने
मनाचा ठाव घेतं ||2||
अमर आहे या जगी
हिच प्रेमभावना
साथ या भावनेला
असह्य प्रेम यातना
द्वेष हरतो प्रेमापुढे
प्रेम एक जगजेत्त
अलगद आणि सहजतेने
मनाचा ठाव घेतं ||3||
