कोण म्हणे
कोण म्हणे
1 min
11.8K
कोण म्हणे विठू खात नाही
नामदेवावाणी तुम्ही खीर देत नाही
कोण म्हणे विठू नाचत नाही
गोऱ्या कुंभारावाणी तुम्ही नाचत नाही
कोण म्हणे विठू गात नाही
कान्होपात्रेवाणी तुम्ही गात नाही
कोण म्हणे विठू दळत कांडत नाही
जनीवाणी तुम्ही त्यासी बोलावित नाही!
