कोण बरे ती?
कोण बरे ती?
मला सागरकिनारी भेटलेली
जास्त नाही पण थोडी होती नटलेली
चोळीमोळी अंगावर घातलेली
कोण बरे ती मला भेटलेली?
डोळ्यात स्वप्नं होते जिच्या दाटलेली
पण परिस्थिती ने होतीजी फाटलेली
काहि क्षण मला आपलेसी वाटलेली
कोण बरे ती मला भेटलेली?
समग्र आकाशाला कवेत घेऊन चालणारी
मोठे मोठेआव्हाने सहजरित्या पेलणारी
कधी कणखर तर कधी नाजुक पणे बोलणारी
कोण बरे ती या लोखंडाला चुकुन
परिस समजुन तोलणारी?
नकळत क्षणी जीवनात प्रवेश केलेली
माझी मती काहि वेळ गुंग झालेली
माझ्यातला " मी " घेऊन गेलेली
नक्की कोण बरे "ती मुलगी "
काल माझ्या स्वप्नात आलेली?
