कॉलेज कट्टा
कॉलेज कट्टा
जीवनात खूप केली
मजा मस्करी थट्टा
अजून आठवतो
तो आमच्या कॉलेजचा कट्टा
पोरी पटवल्या तिथूनच
पिला दही आणि मठ्ठा
अजून आठवतो
तो आमच्या कॉलेजचा कट्टा
इथूनच पुरवला आम्ही
प्रियसीना प्रेमपत्रांचा गठ्ठा
अजून आठवतो
तो आमच्या कॉलेजचा कट्टा
इथेच काढायचो आम्ही
नव्या नव्या मुलींचा कच्चा चिठ्ठा
अजून आठवतो
तो आमच्या कॉलेजचा कट्टा
परीक्षा पार पाडल्या बसून तिथे
मारून पुस्तकांचा रट्टा
अजून आठवतो
तो आमच्या कॉलेजचा कट्टा
बसून इथेच ओढला आम्ही
आनंदी आयुष्याचा सुट्टा
अजून आठवतो
तो आमच्या कॉलेजचा कट्टा
जगत आहे आयुष्य पण
येत नाही जूनी मजा मस्करी थट्टा
अजून उजाळा देतो आठवणींना
तो आमच्या कॉलेजचा कट्टा
