कोंडमारा
कोंडमारा
आई वडिलांची लाडाची छकूली
आजी आजोबांची दुधावरची साय
भावा बहिणींची प्रिय, मायाळू ताई
जणूकाही आहे ही त्यांची हो माय....
मुलगी आहेस घरकामात मदत कर
आईचा,आजीचा सतत असतो नारा
कामे केली नाहीत तर मग काय हो
बाबांचा,आजोबांचा चढतो कधी पारा..
शिकायचे तर मन लावून सारे शिक
ह पण घरातील कामे शिकावीच लागतील
मोठी होवून लग्न होणार हेच कामा येणार
तरच तुला सारे सासरचे चांगले म्हणतील !!
मुलीच्या जातीचा लहान पणापासूनच
कोंडमारा होतो तिच्या भावभावनांचा
आई,आजीजरी मुली असतील तरीही
विचार नाही करत अपल्या लेकीच्या मनाचा....
यातूनच मुलनी जाणकार होते हो
शिकते ,सवरते, शिकवते,सारी कामे करते
माहेरी आणि सासरी ज्ञानाचा उत्तम दीप
सतत तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत राहते.....
