STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

कोकणचा कोळी

कोकणचा कोळी

1 min
331

माझ्या कोकण भूमीत

निळाशार रत्नाकर

शोभा तयाची वर्णाया

शब्द येती झरझर


लाटा बेफाम जोराच्या

सवयीच्या कोळीयांच्या

मासेमारी धंदा त्यांचा

भिती नाही मना त्यांच्या


वाट पाहती कोळणी

सखयाची मनोमनी

लागे चाहूल वादळी

जीव होई उलघाली


येता साजण घराला

रांधी सुग्रास जेवण

घेई मासळी टोपली

हेच सुखाचं गं जीणं


साहित्याला गुण द्या
लॉग इन