कोकणात या
कोकणात या
कोकणात या पाहावया, स्वर्ग दुसरा या भूवरी
घनदाट जंगल पर्वत रांगा, स्वागत तुमचे करी ......
आंबा काजू फणस जांभूळ आणि करवंदे
निसर्गाच्या साथीने उभारीले, किती रोजगार उद्योगधंदे .....
सुरमई पापलेट खेकडे, शिंपले खाऊनिया हो झिंगा
लाल भाजी कुरडू अळूवड्या अन् शेवग्याचाही इंगा .....
सुंदर ओहोळ नदी नाले, पहा आंबोलीला उत्तुंग धबधबे
घुमूनि सारी दुनिया परि, विदेशीही पहात बसे......
शिमग्यातील गवळण राधा, दशावतारी नाटके
हुबेहूब कला आमुचि सातासमुद्रापारही ना हटे ....
दिवाळी दसरा साजरा करुनि मोठा सण गणपती
गुण्यागोविंदाने नांदतो इथे गरीब अन् अरबपती .......
लाल मातीत या बांधिला शिवरायांनी " मालवणी " किल्ला
कोकणची ही अद्भूत किमया, सागरालाही करी ढिल्ला ......
