कोकण - स्वर्गच अवतरले
कोकण - स्वर्गच अवतरले
1 min
195
सह्यांद्रीच्या पायथ्याशी कोकण
शोभून दिसे नयनरम्य कोकण
समुद्राच्या तटी खुलतोय कोकण
सौंदर्याला भारावून रमतोया मन..
सात जिल्हे मिळून बनला कोकण
रचला इतिहास येथे शूर शिवाजीनं
समुद्री किल्ह्यामुळे उठे मालवण
पावन झाली भूमी येथली थोर संतान..
निसर्गाची अपार कृपा आहे कोकणी
कोकण भूमी नटली अपार सौंदर्यानी
शिवाराची शोभा येई फळ बागांनी
आनंदाचे पारणे पिटे या कोकणी..
हिरवळीची खूप छटा बहुरंगी फुले
जंगल झाडी दऱ्या खोऱ्या नदी नाले
कोकणच्या दर्शनाने पर्यटकी भरले
असे वाटे मनी जणू स्वर्गच अवतरले..
