कोकण समृद्धी
कोकण समृद्धी
1 min
283
सह्यांद्रीच्या कडे कपारी
शोभून दिसे रम्य कोकण
समुद्रतटी खुलतोय कोकण
अतूट सौंदर्याने रमतोय मन..
सप्त जिल्ह्याचे झाले कोकण
इतिहाससाक्ष किल्ला मालवण
संतांची भूमी म्हणून आहे पावन
येथील वासी नांदती गोविंदानं..
निसर्गाची अपार कृपा कोकणी
भूमी नटलिया अपार सौंदर्यानी
हरितक्रांती केलीय त्या निसर्गानी
कृपा केली जणूकाही पांडुरंगानी..
निसर्गाची कृपा बहुरंगात फुले
भेट देऊनी धरा पर्यंतकी मोहले
नागवळणी वाट, दऱ्या झरे नाले
असे वाटे जणू स्वर्गच अवतरले..
