कोकिळेचे कुहू कुहू ---
कोकिळेचे कुहू कुहू ---
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.6K
वसंताचे आगमन
चिंचा, बोरे चाखायचे
कोकिळेचे कुहू कुहू
गोड बोल ऐकायचे १
सृष्टीतील चैतन्याने
हिरवाई फुललेली
कोकिळेच्या कूजनाने
आमराई खुललेली २
आनंदाचा शिडकावा
ऋतुराज आल्यावर
कुहू कुहू स्वरसाज
प्रफुल्लित झाल्यावर ३
मुग्ध मंजुळ स्वरांनी
मिळे अक्षय आनंद
मोगऱ्याच्या सुगंधानी
दरवळे सुखानंद ४
कुहू कुहू हुंकाराने
कोकिळेची ललकारी
ऋतू वसंत फुलता
निसर्गाची अदाकारी ५
सुरावट कुहू कुहू
मंत्रमुग्ध करणारी
पक्ष्यांचीही किलबिल
चराचरी हसणारी ६