कोजागिरी
कोजागिरी
1 min
1.1K
कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र आला आकाशी
मोठा गोल गोल लिंबुनीच्या झाडामागे
लपून बाळांना पहात होता गोल, गोल
बाळ पहाताच लपे
लिंबुनीच्या झाडामागे दोघांचा खेळ
लंपडावाचा
अंगणात दूध मसाले केशरयुक्त
शेगडीवरी उकळी फुटून
वाफे वाटे मसाले दुधाचा सुगंध सुहास
चौफेर चांदण्याला चंदामामाला अभिषेक
तिकडे समुद् चौपाटीवर
जनमानसात आनंदी उत्सव
नाचत, वाजत कोळी लोकांचं
सोन्याचा श्रीफळ
समुद्राला समर्पित
