STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

कोजागिरी

कोजागिरी

1 min
386

आश्विनाच्या

गोड मासी

पुनवेची

रात्र खासी.


शरदाचा

ऋतू भारी

चांदण्याची

शोभा न्यारी.


कथा त्याची

ऐका तरी

लक्ष्मी फिरे

पृथ्वीवरी.


जागे कोण

देवी पाहे

भक्तासाठी

उभी राहे.


रातीचा या

खास थाट

दुधाचाच

असे घाट.


आयुर्वेद

सांगे ज्ञान

पौर्णिमेचा

खास मान.


चांदण्यात

बसा आधी

दूर होई

रोग व्याधी.


शरदाची

आली रात

चांदण्याची

बरसात.


Rate this content
Log in