कोजागिरी
कोजागिरी
1 min
774
ती रात कोजागिरीची
रंग उधळीत होती
त्या चन्द्र चांदण्यात
राणी भिजत होती
तो क्षण यौवनाचा
एकांत मागीत होता
भरून नक्षत्राचे प्याले
राजा प्राशित होता
एकेक फुलांचा गन्ध
चांदणे पिठूर मन्द
हर एक नक्षत्र धुंद
जोडीत होते बंध
आळवीत आरोह राग
चन्द्रावरचे डाग
मोहरले ते अभंग
कोजगिरीच्या संग
