कोजागिरी पोर्णिमा
कोजागिरी पोर्णिमा
1 min
127
चंद्राचा पडला लख्ख प्रकाश
चांदण्या खेळु लागल्या आकाशात
धरतीवर आली लक्ष्मीमाता
इंद्र कुबेर म्हणाले आम्हीपण येतो आता
पुनवेच्या रात्री पुजा जागर
घरोघरी भरलेली आहे दुधाची घागर
दाराला तोरण, रांगोळी
Advertisement
दारी
मांगल्य बघुन लक्ष्मी आली घरी
भोळी भक्ति आवडली सारी
केशरी दुध दिले, झाली तृप्त
वैभव देउन झाली गुप्त
आशिर्वादाचा हस्त ठेवी आमच्या डोईवर
दुध देणारी गोमाता राहु दे हिरव्यागार धरतीवर ||