STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा

1 min
333

चंद्र पौर्णिमेचा सुरेख

नभी पूर्ण गोल दिसतो

पांढरा शुभ्र,धवल छान

शीतल,थंड प्रकाश देतो....


शीतल चंद्राच्या किरणात

न्हाहल्या चांदण्या नभांगणी

प्रतिबिंब चंद्राचे शुभ्र दुधात

पाहिले माझ्या हो अंगणी....


धूंद चांदणे,रातराणी बहरली

चंद्रकलेच्या सुरेख साथीने

काळोखात मंद सुगंध पसरती

मंद धूंद वार्‍याच्या संगतीने.....


केशरयुक्त दुधाची चवदार साथ

ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात 

म्हणूया देवीचे श्रीसुक्त महान

दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात....


कोजागिरी पौर्णिमेला अहो बर का

वरीष्ठ अपत्याचे औक्षण करतात

ॠण मातेचे फेडते या वसुधेवरी

मनी आनंदाचे,हर्षाचे मोर नाचतात.....


करूया जागरण या शीतल छायेत

नृत्य ,गायनाचीही मैफील सजवूया

श्रीलक्ष्मीचे होईल आगमन सदनी

तिच्या स्वागताची तयारी करूया.....


नभीचा चंद्रमा खुलला नील आसमंती

जणू काही वसुधेला पाहून हो हसतो

त्याचा मुखचंद्रमा गोल छान पाहून

या अंतराला मोहवितो अती ,मोहवितो अती.....


Rate this content
Log in