STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

कन्यादान...!

कन्यादान...!

1 min
292

कन्या म्हंटल तरी

अंगावर काटा येतो

सारा व्याप अंगास

घाम फोडतो...


कन्या म्हणजे कटकट

अगदी मनात ठासून भरलंय

आजपावेतो तेच तेच

आम्ही जीवनात पाहिलंय.....


पण आता काळ बदलला

कन्ये विषयीची मानसिकता बदलली

कन्या वरदान वाटू लागली

घरोघरी ती हवी हवी वाटू लागली...


पहिली मुलगी धनाची पेटी

असे वडीलधारी मंडळी म्हणायची

नाराज मनावर मायेची

हळूच फुंकर घालायची....


आता कन्या घर भरुन टाकते

आंनदाने घर डोक्यावर घेते

जीवन जगणे सुसह्य करते

जीवनाची सार्थकता मिळवून देतो...


हा हा म्हणत दिवस सरता

तिची घरातून जाण्याची वेळ जवळ येते

कन्यादानाचे मोल समजून देते

आपली उणीव जाणवून देते...


तिच्या दानाने अपार पुण्य लाभते

जन्मोजन्मीचे तीच खरे पांग फेडते

जाता जाता आईवडिलांना 

सौख्य समाधान शांतीचा वर देऊन जाते...


म्हणून सुखी जीवनासाठी

कन्या प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी

कन्यादानाची महती या योगे

सर्वांना कळावी, सर्वांना कळावी....


जा मुली जा ,दिल्या घरी सुखी रहा

म्हणताना उर आईबापाचा भरून येतो

डोळ्यात पाणी साठवून

फक्त बापच सारे दुःख गिळतो....!



Rate this content
Log in