कन्यादान
कन्यादान
दानात दान महादान
म्हणतात ज्याला कन्यादान
पण कन्या काही वस्तू नाही
जिला दानाच्या स्वरूपात दिली जाते
परंतू , ती तर आहे काळजाचा तुकडा
आई वडिलांच्या मानाचा तुरा
हाडामांसाची ही जिवंत बाहुली
लहानाची मोठी करून
इच्छा - आकांक्षांना आपल्या दफन करून
कुणा अनोळखी व्यक्तीच्या हाती सोपवतात
तिथे ती विवाहाच्या नावाखाली
समाजातील परंपरांचा निर्वाह करते
लोक - लाजेखातर सर्व स्वप्ने जाळते
संसाराचा गाडा विनातक्रार ढकलते
यालाच म्हणतात का कन्यादान
इथे कन्येलाच गण्य मानले जाते
रिती - भाती प्रत्येक पूर्ण होतात पण
शेवटी दान हे दानासारखेच वापरले जाते
अशा प्रकारे कन्येचे दान करून
तिचे अस्तित्वच पूर्णपणे संपवले जाते
कन्यादानाच्या नावाखाली पुन्हा एक कन्या
निष्पाप बळीचा शिकार होते.
