कन्यादान
कन्यादान
1 min
336
लेक बासरीचे सुर
गाजे सारे घरभर
राबती आई -बाबा
सारे दिनरातभर
होती किती फरपड
लेक करीती गडबड
लेक वात्सल्याची खाण
धरी बाबाचा कान
लेक परक्याचे धन
बाबा रडतो आतून
आला तो क्षण
मन येते गहिवरून
आई बाबा करी कन्यादान
कन्यादान श्रेष्ठ दान
तो वाढवी मानपान
