STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Others

कन्यादान

कन्यादान

1 min
1.2K

लेक बोज नसते आई बाबाला

आई बाप जपतात परंपरेला.

लेक हि सुदंर बावली

तीच्या बाबांची लाडली

अंगाखांद्यावर खेळली

लहानाची मोठी झाली


जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा

 सार्‍यांनी तोंड फिरवल

आईनी तीला उराशी धरल

बाबांना समजावे

हे धन तर देवाने दिल

लेक बोज नसते आई बाबाला

आई बाप जपतात परंपरेला.


काळजी तीच्या अयुष्याची

अनेक दारे फिरतो पैशासाठी

जेव्हा वेळ येते वर शोधण्याची

लेक बोज नसते आई बाबाला

आई बाप जपतात परंपरेला


मंडप गजबजलेला

चारी दिशा सजलेला

आईच्या डोळ्यातून वाहे अश्रूं धारा

बाबा कठोर पणाचा धावता वारा

ढासळत जाई हाळू हाळू

निरोपा वेळी येई रडू

बिलगून लेकीला..

खंबीर पर्वत शहनात ढासळला


 लेक बोज नसते आई बाबाला

आई बाप जपतात परंपरेला.



Rate this content
Log in