STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

कन्यादान

कन्यादान

1 min
449

दोन हातांच्या कुशीत, पहिल्यांदा तुला घेतलं

खरं सुख म्हणजे काय, ते तेव्हा कळलं

नाजूक तुझ्या बोटाला, मी हळुवार धरलं

एक-एक पाऊल टाकत चालायला शिकवलं।। १।।


तुझ्या गोड झोपेसाठी रात्र-रात्र जागणं

तू जवळ नसताना कासावीस होणं

बोबडे तुझे बोल ऐकून, मनापासून हसणं

विसरून दुनिया सारी, तुझ्यातचं रमणं।। २।।


क्षण सारे तुझे नि माझे,

ओंजळीतून निसटले त्या वाळुसारखे

तशीच ओंजळ चेहऱ्यावर ठेवून

अश्रू लपवून, दाखवतो हसल्यासारखे।। ३।।


कन्यादान आज तुझे करतो आहे

सर्वस्वच जणू मी हरतो आहे

अश्रूंना आखून दिली लक्ष्मणरेषा नयनांची

पण कसं सांगू तुला? अंतरी खूप रडतो आहे।। ४।।


माहीत होते परक्याचे धन आहे

तरी स्वतःला कुबेर समजत होतो

आज मात्र कन्यादान करून

रिती ओंजळ पाहत होतो ।। ५।।


नशीबवान असतो तो,

ज्याला कन्यादानाचं सुख मिळतं

पण लेकीच्या विरहाचं दुःख

कन्यादान करणाऱ्यालाचं कळतं ।। ६।।



Rate this content
Log in