STORYMIRROR

Sarika Musale

Others

3  

Sarika Musale

Others

कन्यादान

कन्यादान

1 min
428

झाले लक्ष्मीचे आगमन 

सुंदर कन्येच्या रुपात

आनंदीत झाले सारेजण

लेक आली घरात


दुडदुडणा-या पावलांनी

घर सारे निनादले

बोबड्या तिच्या बोलाने

मन किती सुखावले


बाबांच्या आनंदाला 

उरला नाही पारावार

हट्ट तिचे पुरवता पुरवता

आई होई बेजार


छोटीशी परी 

कधी मोठी झाली

कळलेच नाही आता

लग्नाला आली


कन्यादान करायचे

आई-बाबा सुखावले

लेक परक्याची धन होणार

म्हणून डोळे त्यांचे पाणावले


जीवापाड सांभाळायचे

दुस-याच्या हाती द्यायचे

जगाची ही रीत कसली

रिवाज कधी बदलायचे?


Rate this content
Log in