कन्या राशी
कन्या राशी
1 min
250
चिकित्सक वृत्ती यांची
मनी दडला संशय भारी
कितीतरी प्रश्न पडतात
ही तर असे कन्या राशी
सहज विश्वास ठेवत नाही
मोजून मापून व्यवहार करी
एकच गोष्ट दहा वेळा करती
अजब ही कन्या राशी
जपून चाचपून करती कर्म
सावध असतात या व्यक्ती
कितीही संकटं आली तरी
पुन्हा सर्वकाही हे मिळविती
प्रसंग असो जरी कुठलाही
चेहऱ्यावर यांच्या भाव नाही
आतल्या गाठीच्या असतात
कन्या राशीच्या व्यक्ती
