STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Others

कंर्दळ मावळला.

कंर्दळ मावळला.

1 min
379

प्रेम भेटावे पहिले 

बघून हासावे थोडे

सणा सुदीला येवून माहेरी 

जाग्या व्हाव्या सार्‍या आठवणी 

हरवलेल्या वाटेवरून पाहवे दूरूनी

तिने पापण्यांनी नजर चोरूनी

डोळ्याने खुप काही बोलूनी

मनात खंत ठेवूनी

दाटलेल्या धूक्यावर थैमान मांडूनी

रचलेल्या प्रेमाची कथा हि अनोखी 

जसे केवड्याचे फुल जणू

दूर वरून धावणारा वारा तु सजणी

येते भुतकाळातील रंगीन क्षण घेऊनी

कंर्दळीच्या बनातील मखमल फुले

फुलपाखरू तरंगत झुले

असे सुंदर प्रेम जुळे

मातीतील प्रित ना मिळे

जन्मोजन्मीच्या गाठी सुटल्या

लडिवाळ होते ते जग त्यात हरवल्या

आठवल्या तेव्हा दूर होहुनी 

समोर लख्ख अंधार घेऊनी

कंर्दळ मावळला

प्रेम भेटावे पहिले 

बघून लाजावे थोडे


Rate this content
Log in