कंपास बॉक्स
कंपास बॉक्स
अजूनही आठवतो तो लहानपणीचा कंपासबॉक्स
जो बाबांनी आणलेला माझ्यासाठी खास
चौकोनी आकाराचा त्यावर हसणारा मिकी माऊस
दोन कप्प्याचा रंगेबेरंगी रंगांनी शोभे खास
त्यात चार पेन्सिल विविध रंगाच्या खोडरबरची जोडी
घराच्या आकृतीचा शार्पनर उठून दिसे त्यात भारी
काचेसारखी स्प्ष्ट दिसणारी पट्टीही त्यात होती
माझ्यासाठी तर तो झाला होता जवळचा साथी
चॉकलेट त्यात कधी मी ठेवीत असे
तर खाऊसाठी दिलेले पैसे
कोणालाही हात लावू देत नसे मी त्याला
शाळेत दिमाखात ने
त असे मी त्याला
पण एकदा असे घडले माझ्या हातून पडून
त्याचे झाले दोन तुकडे आतून
रडत गेले मी बाबांना दाखवायला बाबा म्हणाले
तुटला तो होऊ शकत नाही दुरुस्त
उद्या आणीन तुझ्यासाठी या पेक्षा मस्त
मला तर रडू आवरेना
मला हाच कंपास हवा म्हूणन माझा हट्ट संपेना
बाबांनी मला समजावले उद्या तूच ये आणि असाच कंपास घे म्हणाले
त्यावर मी शांत होऊन मनाला सावरले
दुसऱ्या दिवशी तो तुटलेला कंपास होता डस्टबीनमध्ये
पण इतकी वर्ष होऊन राहिला मात्र माझ्या आठवणींमध्ये