कमळाबाई...!
कमळाबाई...!
एक होती कमळाबाई
तिला बोलायची भलती घायी
तिला वाटे सदा बोलण्यात
उगाच आपला वेळ जायी...
बोलता बोलता निरोप देण्या
तिने केली भलती घायी
बहिऱ्या विठोबाला निरोप मिळता
त्यानेही केली कामाची घायी...
आला विठोबा रातीला दारात
घेऊन घोड्याची वरात
अचंबित झाली कमळाबाई
हातात तशीच धरून परात...
रागे रागे बोलू लागली
विठ्या मेल्या घोड नाही घोंगड रे
असा कसा रे वेंधळा
घेऊन दारी आलास घोडा रे...
विठ्ठल म्हणे कमळीला
आता तर सावकाश बोल
तूच म्हणालीस घोड ग
गाळून मधलं अक्षर ग....
कमलाबाईने तेंव्हा पासून
मौनं सर्वार्थ साधनमचा वसा घेतला
विठोबानेही मग घोडा धाडून
घोंगड्याचा भार खांद्यावर वाहिला...
अशी आमची कमळाबाई
तिला बोलण्याची भलती घायी
जिथे तिथे बहिऱ्या विठ्याची
फिरकी सदा घेत राही.....!
