कळत नाही
कळत नाही
आपल्याच माणसांना आपण नकोसे का वाटतो
मनाचे उत्खनन करून ही
त्याचे उत्तर मिळत नाही
मनात येते अनेकदा,
मनात काही विचार
येऊ न द्यावे मनास
मारून कसे मग जगावे?
ह्याचे उत्तर ही सापडत नाही
मनात ह्या भावनांचा उद्रेक भारी
काही केल्या कधी
समजत देखील नाही
जीवनात आपण कुठेतरी सर्वस्वी चुकत आहोत का?
असे वाटून ही क्षणोक्षणी हे जगण मात्र सरत नाही
कसे ओळखावे मुखवट्यातील खरे चेहरे कोण आपले, नी कोण परके बरे..!
स्वार्थ सोडला की मनुष्याला आनंद देता येतो
आणि घेता येतो हे कळत असतांनाही काहींना वळत नाही
कुणाच्या चेहऱ्यावर हास्य नाही आणता आले तरी
कुणाच्या डोळ्यातील अश्रूचे कारण बनू नये हे कस का? कुणाला बरे कळत नाही..?
आपल्या माणसांची, आपण कसे
वागावे हे कळत नाही
कोणत्या शब्दात नाते गुंफावे उमगत नाही...
