कल्पवृक्ष नात्यांचा
कल्पवृक्ष नात्यांचा
कल्पवृक्ष प्रेमाचा ,समाधानाचा
लावला मी दोनही कुटुंबात
सदैव भावनांचा मेळा छान
भरतो माझ्या दोनही घरात....
माहेरी माझ्या आईबाबांसाठी
जाते नेहमीच मी मायेपोटी
नांदते तिथे माझे बालपण
मुक्त मी सदा विहरण्यासाठी.....
सासरी पाझरतो प्रेमाचा झरा
पतीसमवेत मी आनंदानं नांदते
सासू सासर्यांसमवेत सासरी
मोद,हर्षाने अंगणी मी बागडते.....
मुले सदा हसरी ,खेळती अंगणात
बहरतात फुलेही माझ्या परसात
वृद्धांची गप्पांची मेजवानी चालते
सांजसमयी या नील नभांगणात....
दोनही घरांचे दीप प्रज्वलीत करते
आनंदाचे,सुखाचे ,घोट नित्य घेते
कधीतरी दुःखाची सावली पडतेच
तेव्हा मात्र मी खंबीरपणे पचवते.....
