कल्पना चावला
कल्पना चावला
1 min
645
अंतराळात फिरण्याचे स्वप्न होते तिच्या उरी
भारतीयांच्या मनातील झाली कल्पना ही परी
कुटुंबातील भावंडात होती सर्वात धाकटी
प्रथम अंतराळवीर ही देशाची मानकरी
एकटी नासात स्थान मिळविले प्रसिद्ध वैज्ञानिक म्हणून
विमान प्रशिक्षण घेताना आली रेशीमगाठी जुळून
स्पेस शटलमध्ये झाली पहिल्या मोहिमेस निवड
करून प्रवास प्रुथ्वीभोवती जोपासली आपली आवड
मायक्रोग्राविटी वापरण्यास टीमसोबत केले ऐंशी प्रयोग
मग कोलंबिया यानासंगे जाण्यास जुळून आला योग
अंतराळ यात्रा शेवटची ठरली त्यांच्या जीवनात
अतिदु:खदायक ही घटना कोरली भारतीयांच्या मनात
