कळेना!
कळेना!
1 min
260
शांत, सौम्य, शीतल वारा,
स्तब्ध का झाला?....
रात्रीचा दीप उजळला, मग
मंद का झाला?...
अथांग सागर उसळला,
ओहोटी का गेला?....
विशाल नभी, असंख्य तारे,
एकच का निखळला?....
गाणार्या पाखरांचा रव,
शांत का झाला?....
कळीसाठी गुंजन करी
भ्रमर, दूर का सरला?...
रेशमी बंधनाला अचानक,
विराम का लागला?.....
