कलाकार
कलाकार
1 min
170
मानवाची निर्मिती ही बाई
माहीत नाही कशी झाली
या सृष्टीचा निर्माता कोण?
विचारांची झाली काहिली,....
धरेवर सौंदर्य विविध वृक्षांचे
नदीचे,सागराचे,अन धुक्याचे
अवचीत कोसळणार्या पावसाचे
नभोमंडपी स्थित चंद्र- तार्यांचे...
गगनी विलासतो तेजःपुंज रवी
संपूर्ण धरेवर हा राज करतो
दिन रातीचा कार्यकर्ता रवी
गगनातून गाली मस्त हसतो...
कोणी घडवले अदभूत हे जग
कोण आहे सृष्टीचा चित्रकार
आभार मानू,वंदन करू आपण
अज्ञात आहे हा सुरेख कलाकार.....
सृष्टीचे नयन मनोहर नजारे सारे
नयनी साठवू,आनंदी गीत गावू
जरी मृत्यू समीप आला तरी
आठवात त्या क्षणांच्या रमून जावू...
