किशनकन्हैया
किशनकन्हैया
1 min
203
वसुदेव देवकीचा
बाळ असे तान्हा
यशोदा मैय्येलाही
आला प्रेमाचा पान्हा .....
कान्हाच्या लिलया
फारच बाई छान
रमले सारे ग्वाल
गोकुळ आहे महान...
द्वाड बाई हा कान्हा
किती करतो खोड्या
सावळा हरी हा नटखट
गोपिका कान्हासाठी वेड्या...
चोरून दही चाखतो
लाडका यशोदा मैयाचा
सुरिली बासरी वाजवतो
बाळकृष्ण हा सर्वांचा.....
गोपिकांसवे कान्हा खेळतो
रासलीलेत मग्न राहतो
गोपांसवे नित्य रमतो
गाईंसाठी बासरी वाजवतो....
गोपिकांना सतावतो
पिचकारीने रंग उडवतो
कालीया मर्दन करतो
गोकुळात आनंद नांदतो...
