किल्यांचा राजा - शिवबा
किल्यांचा राजा - शिवबा
मराठी साम्राज्याचा संस्थापक
तमाम जनतेचे आद्य दैवत
सामर्थ्यशाली , लोककल्याणकारी
श्री छत्रपती शिवाजी राजा
सर्वधर्म सहिष्णुतेचा प्रणेता
भारतीय राष्ट्रीयत्वाचा निर्माता
स्त्रियांचा केला आदर नेहमी
स्वधर्माचा जाज्वल्य अभिमान बाळगला
दक्ष प्रजापालनेचा जनक हा
जन्म याचा शिवनेरी गडावर झाला
अष्टप्रधानांची करून नियुक्ती
युद्धात गनिमी काव्याचा अवलंब केल
सर्वप्रथम जिंकला तोरणा
पन्हाळा , शिवनेरी , जिंकले पुरंदराला
गड - किल्यांना बनवून पहारेकरी
राज्याची राजधानी बनवले रायगडाला
मोगल साम्राज्याचा केला खातमा
विजापूरचा आदिलशाहही हरला
जलदुर्गांची करून निर्मिती
अरबी समुद्रावर कब्जा मिळवला
सिंधुदूर्ग , विजयदुर्ग , मुरूड आणि जंजिरा
गडांनी या रोखले परकीय आक्रमणांना
महाराजांच्या अखत्यारीतील किल्यांची यादी मोठी
सर्वांनी मिळून महाराष्ट्राचा सुंदर इतिहास घडविला
