किल्ले महाराष्ट्राचे
किल्ले महाराष्ट्राचे
1 min
197
झाले पावन श्री शिवरायांच्या
पदस्पर्शाने महाराष्ट्रातील गड किल्ले।
आठवण मनी ठेवूया छत्रपतींची
हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापिले।।
भवानी मातेची मिळे शक्ती
असे सदैव आशीर्वाद पाठीशी।
विजयाची पताका रोवली
शोभे तलवार अन ढाल हाताशी।।
असे पराक्रम मावळ्यांचा
रक्त अन बलिदानाचा।
आदर्श ठेवू शिवरायांचा
आठवू प्रताप राजांचा।।
कित्येक किल्ले सर केले
कित्येकांना दिला उजाळा।
रायगड, प्रतापगड
शिवनेरी अन पन्हाळा।।
डौलाने दिमाखात उभे असती
देई साक्ष पराक्रमाची जगाला।
जग सारे अचंबित होई
पाहुनी शिवरायांच्या कर्तुत्वाला।।
