कीस डे...
कीस डे...
1 min
460
जन्मताच लहान बाळ
आई त्याची पापी घेते
त्याला प्रेमानं कुरवाळते
छातीशी घट्ट धरते....
हा पण एक kiss day
कामावरून येताना बाबा
खाऊ छान आणतो
बाबांची बाळ पापी घेते
खाऊ खाण्यात दंग होतो...
हा पण एक kiss day
आजी-आजोबा बाळाचे
खूप लाड पुरवतात
खूप कौतुक पण करतात
आणि सारखी पापी पण घेतात...
हा पण एक kiss day
सजणाने सजणीला
घेतले छान कुशीत
ओठावर ओठ टेकवले
सजणी आली खुशीत.....
हा पण एक kiss day
शाळेतील बाळे माझी
अभ्यास छान करतात
घेतली पापी त्यांची मी
उपक्रमात मुलं रमून जातात...
हा पण एक kiss day
