कीर्तन / भजन
कीर्तन / भजन
तुझ्या या भजनात रात सारी सरली
तुझ्या या महाली तहान भुक हरली। ।। धृ ।।
केली यमनानी सुरुवात शृंगार रसाची
थाप तुझी पडली नाजुक थिरकली शाई तबल्याची
गोंडस स्पर्श बोटांचा ही काया रसरसली ।। 1 ।।
आले तुझ्या मैफिलीत चन्द्र चांदण अंगणी
सजले मी रे नक्षत्रांनी शुक्राची मी
चांदणी
वाटते अप्सरा मी स्वर्गसुखी मी नटलेली ।। 2।।
स्वर तुझे लागु देत आरोह उच्च कम्पनांनी
वादी संवादी मी लावते कमनीय बंधानी
तुझ्या चंदेरी दुनियेत अशी मी भक्त भिजलेली। ।। 3 ।।
ओली झाली पहाट गेले नभीचे रे पक्षी
मेंदीच्या पानावर नाजूक कोरुनीया नक्षी
रात राणीचा सुगन्ध अजुनीया आहे साक्षी
अजुनी अंतरात गुलाब दाणी
मोहरलेली। ।। 4 ।।
