STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

4  

Rohit Khamkar

Others

खवय्ये

खवय्ये

1 min
346

मध्यम वर्गीय मराठी आम्ही, कधीतरी लहर यायची खास.

एक दिवस इडली बनवायची, अस वाटायचे सोहळा आहे आज.


सणासुदी ला हमखास, नैवेद्य व्हायचा पुरणपोळीचा.

कधी पाहुणे आले घरी तर, रात्री आवाज यायचा नळीचा.



अचानकच झाली घाई धावपळ, दरवळे बेसनाच्या पिठल्याचा वास.

धपाट्या सोबत दह्याने ह्या उतरवला, तापलेल्या उन्हाचा हा माज.



आळुच्या वड्या आधी, नंतर खीरीवर ताव मारू.

गरम गरम वरण भातावर, साजूक तूप थोड सारू.



उकडीच्या भरीव मोदकांची, बाप्पा पेक्षा आम्हालाच जास्त घाई.

गुपचुप हात लावताच, स्वयंपाक घरातून ओरडते आई.



गोड आंबट तिखट कडू, सगळ खातो आम्ही चवीने.

आईच्या हातचे पदार्थच भारी, खवय्ये बनवले आवडीने.


Rate this content
Log in