खूप तरल
खूप तरल
1 min
170
खूप तरल
खूप खोल
कधी दाटून येत
कसं दाटून येत
याचा थांगपत्ता लागत नाही
पण स्वस्थ काही बसवत नाही
त्रस्तपणा पाठ काही सोडत नाही
घालमेल जीवाची
तळमळ काळजाची
सांभाळता काही येत नाही
तोल काही आवरता येत नाही
अलिकडंच - पलीकडंच
बधीर मन
बहिरे कान
आतले बाहेरचे चेहरे
मात्र बघत राहतात
गर्दी करून
गर्दीच राजकारण
काही केल्या समजत नाही
काही काही कळत नाही
तळ काही केल्या सापडत नाही
किनारा कधी येतच नाही
किती तरल
किती खोल
याचा थांगपत्ता काही केल्या लागत नाही
