खुर्चीत गप्प राजा
खुर्चीत गप्प राजा
1 min
161
नात्यात वाद नुसते, कामे कुणी करावे
खुर्चीत गप्प राजा, दोषी कुणा धरावे!
बगळे बसून खाती, सरता तया सरेना
कामे करून आम्ही, अन्ना विना मरावे!
खरडून पावसाच्या, पाण्यात रान गेले
रानातल्या गुरांनी,राजा कुठे चरावे!
गाडी न कार गरिबा, गावी कशात जावे
अन् संप वाहकांचे,राज्यातल्या सरावे!
रे त्रस्तत्री लोक सारे, पाहुनी भांडणेे सारे
वेळेत काम करण्या, मंंत्र्या कलम ठरावे!
कोटी करोड पैसा आहे, तुझ्याकडेे पण
कर्जात बाप आमचा, हप्ते कसे भरावे. !
