खुर्ची....!
खुर्ची....!
1 min
665
हाव किती मोठी असते
हे आता प्रत्यक्ष जाणवते
प्रत्येकालाच खुर्चीचे भूत
सारख सारख खुणावते...
साधं सोपं गणित
आता अवघड होऊन बसले
खुर्ची मिळाली तरी
वाटेल आता हे नशीब कसले...
खुट्टया मारून ठेवलेत
प्रत्येक खुर्चीला
चांगलीच जिरेल आता
बुड टेकता खुर्चीला....
भीक नको कुत्रं आवर
म्हणावे लागणार आहे
खुर्चीची हौसच आता
पुरती भोवणार आहे....
हवसे नवसे गवसे
अडकले तर फाटणार आहे
लोकशाही चांगलाच
हिसका आता दावणार आहे....
सुजाण मतदाराने
चांगलाच सूड उगवला आहे
लुंग्या सुंग्याना आता नक्की
आसमान दिसणार आहे....!
