खुर्ची
खुर्ची

1 min

12K
किमया आहे तिची न्यारी
तिच्या मागे दुनिया सारी
तिला मिळवण्यासाठी रस्सीखेच
सगळेचजण करी
घरातली असो वा संगीत खुर्चीतली वा राजकारणातली
तिच्यावर हक्क बजावण्यासाठी सगळेच स्वार्थी होई
तिला मिळवणे म्हणजे अधिकार गाजवणे
स्वतःला गर्विष्ठ करणे
ती आहे एक साधी बसण्याची वस्तू
पण अजब तिची जादू
तिच्या नादी भले भले रावापासून रंक होई