STORYMIRROR

Anagha Kamat

Others

3  

Anagha Kamat

Others

खुर्ची मंत्र्यांची

खुर्ची मंत्र्यांची

1 min
251

खुर्चीला महत्व आहे फार 

मंत्र्यांचा खुर्चीवर असतो भार 


खुर्चीवर बसणाऱ्यांना मिळतो सलाम 

अदबीने म्हणतात लोक "रामराम" 


खुर्चीवर बसणाऱ्यांची लागते चढाओढ 

वर्चस्व राखण्यासाठी करतात तोडफोड 


मानाच्या खुर्चीवर चिकटून बसतात 

तिथे बसल्यावर मात्र लोकांना डसतात 


खुर्ची मिळवण्यासाठी मागतात मतांचे दान 

मतांवरून ठरवायचे असते महान आणि लहान 


खुर्चीची आंतरिक ओढ असते हो भारी 

मिळवली जाते खुर्ची, करून मारामारी 


खेळ असतो हा संगीत खुर्चीसारखा 

एकाला मिळतें खुर्ची, दुसरा होतो पारखा 


सामान्य माणसाला खुर्चीची नसते ओढ 

त्याला आपले कौटुंबिक जीवन लागते गोड.


Rate this content
Log in